पंतप्रधान मोदी अन् आमदार राजळे भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा
पाथर्डी । वीरभूमी- 07-Aug, 2021, 12:00 AM
माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपच्या काही महिला आमदारांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Prime Minister Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्या सह विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थक महिला आमदारांची दिल्लीवारी (Delhiwari of women MLAs) भाजपसह राजकीय वर्तुळात चर्चेचा (Discussed in political circles) विषय ठरली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा समावेश न झाल्याने पंकजा मुंडे यांची नाराजी वाढली. गेल्या काही दिवसात अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत स्वतःविषयी राजकीय लक्ष वेधून घेण्यात पंकजा यशस्वी झाल्या. त्यांचा वाढदिवस झाल्यानंतर काही दिवसांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे निमित्त करून आमदार मोनिका राजळे यांच्या पुढाकाराने परळीचा दौरा आखण्यात आला.
आ. राजळे यांच्यासमवेत मेघना बोर्डीकर, सीमा हिरे आदी उपस्थित होत्या. केंद्रीय मंत्रिमंडळातील राज्यातील नितीन गडकरी, नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील या मंत्र्यांच्या भेटी घेऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. भेटीचा तपशील ज्या पद्धतीने देण्यात आला. त्यावरून राजकीय चर्चेला प्रारंभ झाला.
पंतप्रधान मोदी यांची भेट झाल्यावर त्यांनी महिला आमदारांचे मराठी भाषेतून स्वागत करत महिला सक्षमीकरण, मतदारसंघातील पक्ष संघटनेतील बळकटीकरण या विषयावर चर्चा केल्याचे आमदार राजळे यांच्या कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा प्रभाव व निर्णयक कौल मिळवण्याची हातोटी पाहता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घ्यावा, असा प्रयत्न महिला आमदार मोनिकाताई राजळे यांनी केल्याबाबत कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो.
यासाठी राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन दिल्लीत मुंडे यांचे समर्थक लॉबी अधिक बळकट होण्याची प्रक्रिया गतिमान होणार असल्याचा विश्वास मुंडे समर्थकांना वाटतो.
ifTbzAZGIhdlHRKv