काळजी घेण्याचे आवाहन । दहा दिवसात उपचार घेणार्या रुग्णांची संख्या सात पटीने वाढली
अहमदनगर । वीरभूमी - 15-Jun, 2022, 01:50 PM
देशासह महाराष्ट्रात कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाढू लागली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोरोनाची चौथी लाट आल्याचे आरोग्य संघटनेकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्याही कासव गतीने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे.
मागील आठवड्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील आकडेवारी हळू हळू वाढत होती. आज बुधवार दि. 15 जून रोजी अहमदनगर जिल्ह्यात 14 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त होवू लागली आहे.
दि. 5 जून रोजी अहमदनगर जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या कोरोना बाधितांची संख्या 7 एवढी होती. त्यामध्ये हळूहळू वाढ होत मंगळवार दि. 14 जून पर्यंत ती 42 एवढी झाली. त्यातच आज तब्बल 14 कोरोना बाधितांची भर पडणार असल्याने हा उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या 50 च्या पुढे जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या आकडेवारीमुळे चिंता व्यक्त होत असून जिल्ह्यातही चौथी लाट येईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात बुधवार दि. 15 जून रोजी श्रीरामपूर 5, नगर शहर 2, नगर ग्रामीण 2, नेवासा 2, इतर जिल्हा 1, राहुरी 1, शेवगाव 1 असे 14 कोरोना बाधित आढळले आहेत. तर मंगळवार दि. 14 जून रोजी जिल्ह्यात 5 कोरोना बाधित आढळले होते.
यामुळे मंगळवार पर्यंत उपचार सुरू असलेल्या कोरोना बाधिताची संख्या 42 वर पोहोचली होती. यामध्ये आजच्या आकडेवारीची भर पडणार आहे. मात्र कोरोना मृत्यूचा आकडा हा शुन्यावर असल्याने दिलासा मिळत आहे.
तरी नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरण्यासह प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. तसेच इतर प्रतिबंधक नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ozQOIhkEHljpUr