शेवगाव तालुका भाजपाची कार्यकारीणी जाहीर
तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांचेकडून विविध आघाड्यासह भाजपा मोर्चा पदाधिकार्यांच्या निवडी
शेवगाव । वीरभूमी - 17-Feb, 2024, 10:32 PM
भाजपच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी तुषार शिवनाथ वैद्य यांची निवड जाहीर झाल्यानंतर तालुका कार्यकारीणी व इतर आघाडी पदाधिकारी निवडीकडे लक्ष लागले होते. यावर आज तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी जुन्या-नव्याचा मेळ घालून 4 सरचिटणीस, 10 उपाध्यक्ष, 10 चिटणीस, 22 कार्यकारीणी सदस्य अशा 46 जणांनी शेवगाव तालुका कार्यकारीणी जाहीर केली आहे.
आज जाहीर केलेल्या तालुका भाजप कार्यकारीणीमध्ये सरचिटणीस- बाळासाहेब भानुदास डोंगरे, गुरुनाथ एकनाथ माळवदे, तुषार नारायण पुरनाळे, राहुल केशरचंद बंब. तालुका उपाध्यक्ष- रवींद्र साहेबराव तानवडे, दादासाहेब बापुराव भुसारी, अनिल उत्तम खैरे, भाऊसाहेब गेनू देशमुख, अंबादास बाबासाहेब ढाकणे, अर्जुन विष्णु ढाकणे, रणजीत धनसिंग वने, अनिल प्रभाकर वडागळे, अंकुश यालाप्पा कुसळकर, अशोकराव मुरलीधर इसरवाडे.
चिटणीस-आसाराम नामदेव नर्हे, मंगेश भाऊसाहेब पाखरे, सोमनाथ पंडितराव नेमाने, विलास भाऊसाहेब फाटके, मयूर अनिल हुंडेकरी, लक्ष्मण बबन दसपुते, परशुराम पाटीलबा गरड, गणेश मुरलीधर केसभट, अशोकराव शंकर लिंबाळकर, बंडू दादासाहेब हागे.
कार्यकारिणी सदस्य- सोमनाथ भिसे, पांडुरंग खंडू मिसाळ, बद्रीशेठ बुधवंत, हरिभाऊ झुंबड, आण्णासाहेब सदाशिव निकम, भगवान विठ्ठल पाटील, नामदेव कारभारी सुसे, भिमराज हरिभाऊ ठोंबळ, शरद थोटे, आप्पासाहेब सुकासे, उद्धव वाघ, बंडू कुलाळ, बंडू लिंबाजी जवरे, शंकरराव चिकने, सुरेश थोरात, राम आप्पा गिरम, उद्धव काजळे, सूर्यकांत बाबा भुसारी, शिवाजीराव काटे, ज्ञानेश्वर बोडखे, भाऊराव भापकर, लहुराव भवर यांची तालुका कार्यकारीणी जाहीर केली आहे.
तसेच शेवगाव तालुका भाजपा मोर्चा पदाधिकारी म्हणुन शितल परमेश्वर केदार (महिला मोर्चा तालुका अध्यक्ष), अशोक एकनाथ गाढे (ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष), संजय रामनाथ टाकळकर (किसान मोर्चा तालुका अध्यक्ष), बाळासाहेब सारंगधर खोसे (किसान मोर्चा सरचिटणीस), मैनुद्दीन हमीद शेख (अल्पसंख्यांक मोर्चा तालुका अध्यक्ष), मधुकर पोपट वाघमारे (अनुसुचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष) यांच्या निवडी केल्या.
तर शेवगाव तालुका भाजपा आघाडीमध्ये सुनील आसाराम तागड (कामगार आघाडी तालुका अध्यक्ष), अजिनाथ रावसाहेब मासळकर (भटक्या-विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष), बुवासाहेब गोधाजी केकाण (ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी तालुका अध्यक्ष), कल्याण महाराज पवार (अध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष), किरण रामेश्वर पाथरकर (सोशल मीडिया आघाडी तालुका अध्यक्ष), सुरज अरुण लांडे (व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष), प्रमोद तांबे (सांस्कृतिक आघाडी तालुका अध्यक्ष).
कार्यकारीणीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणुन खा. डॉ. सुजय विखे, आ. मोनिकाताई राजळे, प्रदेश चिटणीस अरुण मुंढे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब कोळगे, दिनेश लव्हाट, माजी तालुका अध्यक्ष ताराभाऊ लोढे, बापुसाहेब पाटेकर, माजी सरचिटणीस भीमराज सागडे, गणेश कराड, किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष कचरु चोथे, जिल्हा चिटणीस वाय. डी. कोल्हे, जिल्हा कार्यकारीणी सदस्य आण्णासाहेब ढोके, जिल्हा सरचिटणीस शिवाजी खेडकर, सालारभाई शेख, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष राजाभाई लड्डा, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोलराव सागडे यांचा समावेश आहे.
शेवगाव तालुका भाजपा कार्यकारीणी जाहीर करतांना सर्वांना विचारात घेऊन नव्या जुन्याचा मेळ घालवून कार्यकारीणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. या कार्यकारीणी व्यतिरीक्त आणखी काही आघाडी अध्यक्ष, कार्यकारीणी सदस्य व इतर काही पदांचा समावेश करणे बाकी आहे. येणार्या काळात या पदाचा उपयोग पक्ष वाढीसाठी करुन त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करुन सामान्यांना न्या देण्यासाठी पदाचा वापर करणार आहे.
- तुषार वैद्य, तालुका अध्यक्ष, शेवगाव भाजपा
mJHUYjiz