शेवगाव । वीरभूमी - 27-Dec, 2020, 12:00 AM
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २७ व्या अखिल भारतीय नवोदीत मराठी साहीत्य संमेलनाचे आयोजन शेवगाव येथील अजिंक्य लाँन्स येथे आज करण्यात आले होते. त्याचे उदघाटन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते झाले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक डाँ. बाबुराव उपाध्ये होते. यावेळी निमंत्रक डी. एस. काटे, स्वातगताध्यक्ष कवि दिनेश लव्हाट, पंचायत समितीचे सभापती डाँ. क्षितीज घुले, अरुण लांडे, मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, प्रसिद्ध नाटककार फुलचंद नागटिळक, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, नगरसेवक अशोक आहुजा, सुनील रासने, राजेंद्र मराठे आदी प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना उपाध्ये म्हणाले की, साहित्य हे आक्रमक असते. साहित्य संमेलने होणे ही काळाची गरज आहे. साहित्य निर्मितीला कोणताही मोठा खर्च लागत नाही. साहित्य हा समाजाचा आरसा आहे. संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून साहित्याचं मोठं महत्त्व सांगितल आहे. साहित्य हे चिरंजीव असून माणसाचे मन जागविण्याचे काम ते करते.
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या राष्ट्रीय उदयोजक पुरस्कार विजेते मनोज कदम, राष्ट्रीय, ज्येष्ठ साहित्यीक वसंत मुरदारे, माजी प्राचार्य शिवनाथ देवढे, कवयित्री अस्मिता मराठे, उत्कृष्ट उदयोजक बी. जे. मुरदारे, प्रवरा मेडीकल ट्रस्ट, आधार फाऊंडेशन, पत्रकार सचिन सातपुते, अनिल कांबळे, शैलेजा राऊळ, उध्दव देशमुख, उचल सामाजिक संस्था, पोलीस नाईक आण्णा पवार, डाँ. संजय लड्डा, प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब राहटळ, नामदेव चेडे, आदींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी माजी आ. चंद्रशेखर घुले, कवि दिनेश लव्हाट, शरद गोरे, राजकुमार काळभोर आदींची भाषणे झाली.
दुपारी आजच्या सामाजिक समस्या या विषयावर ज्येष्ठ विचारवंत व माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे यांच्या अध्यक्षयतेखाली चर्चासत्र झाले. प्रसिद्ध कवी कैलास दौंड, देविदास शिंदे व अर्चना डावखर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सत्रात कवि समेलन झाले. यामध्ये राम रोगे, अरविंद शेलार,के.बी.शेख, अविनाश बुटे, विठ्ठल घडी, प्रमोद सुर्यंवशी, शहादेव सुरांशे, महेश मगर कविंनी विविध विषयावर कविता सादर केला. फुलचंद नागटीळक यांच्या नटसम्राट या नाटयप्रयोगाचा ५३५१ वा प्रयोग सादर केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी तर सुत्रसंचालन संगिता फासाटे व अस्मिता मराठे यांनी केले. तर तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी आभार मानले.
pdMIsLfa