शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांची बदली
शेवगाव । वीरभूमी- 17-Sep, 2021, 12:00 AM
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली झाल्यानंतर आता शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांचीही बदली झाली आहे. तहसीलदार यांच्या विरोधातही काहींनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व नाशिक विभागिय आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
तहसीलदार अर्चना पागिरे यांची अहमदनगर जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी या पदावर बदली झाली आहे. तर शेवगावला तहसीलदार म्हणुन जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी छगन मुरलीधर वाघ यांची नियुक्ती झाली आहे.
शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे या मागील काही दिवसापासून आरोपाच्या गर्तेत अडकल्या होत्या. ऐन पहिल्या लॉकडाऊनच्या काळात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विशेष कामगिरी करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या होत्या.
मात्र त्यानंतर त्यांच्याबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व नाशिक विभागिय आयुक्त यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हेतर तहसीलदार अर्चना पागिरे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषणही करण्यात आले होते.
यामुळे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बदलीसाठी विनंती अर्ज केला होता. त्यांच्या या बदली अर्जाची दखल घेत त्यांची अहमदनगर जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणुन बदली केली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी छगन मुरलीधर वाघ यांची शेवगावचे तहसीलदार म्हणुन बदली केली आहे.
XuzSqQJTVdC