शेवगावात 23 डिसेंबरपासून शिबिर
शेवगाव । वीरभूमी - 13-Dec, 2022, 09:53 AM
शेवगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने 23 ते 26 डिसेंबर या कालावधीत हेमंत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसाठी शारिरीक, बौध्दीक प्रशिक्षणासोबतच विविध मैदानी खेळ, स्पर्धा, सुर्यनमस्कार, दंड, नियुध्द, योगासने, घोष यांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक होणार आहे.
शहरातील पाथर्डी रस्त्यावरील राजमाता जिजाऊ नगर येथे भव्य दहा एकर क्षेत्रावर शिबीरार्थीची निवासी व्यवस्था करण्यात आली असून आज शनिवार दि. 10 रोजी त्याच्या मंडप उभारणीचा प्रारंभ जोग महराज संस्कार केंद्राचे प्रमुख राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संघाचे जिल्हा कार्यवाहक वालमिक कुलकर्णी, शिबीर अधिकारी चंद्रकांत काळोखे, चंद्रकांत मोहीते, तालुका कार्यवाहक हरीश शिंदे, व्यवस्था प्रमुख राम देहाडराय, ज्येष्ठ स्वयंसेवक जगदीश धुत, डॉ. कृष्णा देहाडराय, बाळासाहेब देशपांडे, डॉ. धिरज लांडे, विनोद ठाणगे, डॉ. प्रदिप उगले, नितीन मालानी, गणेश केदार, रेशम शेळके आदींसह स्वंयंसेवक उपस्थित होते.
हेमंत शिबिरात लष्करी जीवनाचा अप्रत्यक्ष अनुभव व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिचय करुन घेण्यासाठी पूर्णवेळ सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर दक्षिणचे संघचालक डॉ. रविंद्र साताळकर यांनी केले आहे.
Comments